Tuesday 13 September 2016

सहज सुचलं म्हणून



आजकाल कुणाशी बोलवासे वाटत नाही.सगळी लोक मुखवटा ओढवुन ठेवलेली आहेत. या क्षणी एक तर दुसऱ्या क्षणी भलतच काही....! 

पाठ फिरताच निंदा..शी..!! कस होत या लोकांच..!आणि हयात "आपले लोक" पण असतात...तेव्हा सगळ्यात जास्त वाइट वाटत...
"आपल्या" लोकांसाठी केलेला त्याग आणि adjustment कधीकधी फक्त एक 'नकाराने' त्यांच्या आठवनीतुन delete करतात... खुप राग येतो...आणि तेव्हा वाटत "एकट असतो तेच बर असते"

कधीकधी मग अशी वेळ येते की आपण मानसांपासुनच कंटाळा यायला लागतो..अगदी नकोसे होते त्यांच्यासोबत....

सोबत रहा, mood सांभाळा, त्यांच्या मनाप्रमाने वागा, त्यांच्या इच्छा आकांक्षान्ना जास्त महत्व द्या... हे काय जगणे..आणि या सगळ्यात आपण पार गुरफटुन दमुन जातो..

इतक सगळे करूनपन प्रेमाचे शब्द, विश्वास, आपुलकि, त्यांचा वेळ मिलतेच अस नाही.
"स्वतःला काय हवे आहे?"
हा प्रश्न न राहवुन स्वतःला विचारला जातो. काय मिळते हे सगळे करून??
हे सगळे कशासाठी??

एकटेपणाला घाबरतो म्हणून??
हो..खुप विचार करून हेच उत्तर मिळाल....

लहाणपनापासुन पुस्तकात 'माणुस हा समाजशील प्राणी आहे' वगैरे शिकलोय..सुरक्षिततेसाठि वगैरे म्हणून आपण सोबत राहतो..एकटे पडु म्हणुन कधीकधी आपन चुकीच्या गोष्टिन्नापण  support करतो आणि आपल्या स्वताशि खोट बोलतो..वेळ देत नाहीस्वताला..आणि जेव्हा मनस्ताप शिवाय काहीच मिळत नाहिये अस कळाल्यावर फक्त मोजकिच पण चांगली मानस हवीत अस वाटते...!

कधीकधी खर वैताग येतो..मग ह्या सगळ्या गोष्टिपासून  बाहेर पडायचा प्रयत्न करत असताना लक्षात येते की जीवन इतके नीरस करून  घेण्यापेक्षा छंद जोपासने ,पुस्तक वाचने अश्या अनेक चांगल्या गोष्टिपण आपल्याला अशा लोकांपासून वाचवतील आणि you never know खरया खुरया योग्य "सोबत" मिळवून द्यायला पन मदत करतील!!

विचार करा..नक्की पटेल!